सविधान मानवी जीवनासाठी पथदर्शक- प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, राज्यशास्त्र विभाग व विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंती निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले गेले होते.

‘भारतीय संविधान आणि आपण’ या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय संविधान तथा घटना निर्मितीची प्रक्रिया, राज्यघटना निर्मितीमागील इतिहास, भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना विविध देशांच्या राज्यघटनेचा केलेला अभ्यास , भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, घटनेमध्ये असणारी कलमे व तरतुदी, भारतीय राज्यघटने मधून माणूस मूल्यांवर जगतो ती मूल्ये कोणती आहेत हे आपणास भेटते, याबरोबरच दैनंदिन जीवन व्यतीत करण्यासाठी संविधान कसे मार्गदर्शक आहे.यावरही प्राचार्य डॉ. आय.बी.जाधव यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गुलाबराव पारखे, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. विश्वास कोकणे, बी.बी.ए. (सी.ए.) शाखाप्रमुख प्रा. स्वप्नील डोके, राज्यशास्त्र विभागातील प्रा. सुनील नेवकर, प्रा.अमोल दप्तरे, प्रा. केतन चव्हाण, प्रा. नितीन वाघ, प्रा. रवींद्र वाळे, प्रा.अर्चना ओताडे, प्रा. नमिता घोडेकर, प्रा. राजश्री फलके, प्रा.मृणाल लोणकर, प्रा.भाग्यश्री गोपाळे, प्रा.ज्ञानेश्वर लोखंडे,प्रा. आदिती काळे, प्रा.सृष्टी बोराडे, इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील नेवकर यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डाॕ. गुलाबराव पारखे यांनी केले, तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ.माणिक बो-हाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपटराव माने यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Previous articleकानसे गावात श्री काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न
Next articleकवठे येमाई येथील यात्रेला रंगला कुस्त्यांचा भव्य आखाडा