कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी) केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघचे अरुण गाडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मान्यतेने पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची पदाधिकारी निवड गौतम कांबळे राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांनी जाहीर केली .

निवड झालेली कार्यकारिणीची पुढिलप्रमाणे मारुती वाघमारे जिल्हाध्यक्ष माध्यमिक विभाग,शंकर घोडे जिल्हा महासचिव माध्यमिक विभाग, दादा डाळिंबे जिल्हाध्यक्ष प्राथमिक विभाग, चंद्रकांत सरवदे जिल्हा महासचिव प्राथमिक विभाग, सुनील रुपनवर जिल्हा कार्याध्यक्ष प्राथमिक विभाग, जयवंत पवार उपाध्यक्ष प्राथमिक विभाग,विजय जाधव जिल्हा संघटक,विनोदकुमार भिसे जिल्हा उपाध्यक्ष प्राथमिक विभाग,दौंड तालुका उपाध्यक्ष:-दुर्योधन चव्हाण इंदापूर तालुका, कार्याध्यक्ष:-दादाराव लांडगे यांची निवड करण्यात आली या संघटनेमार्फत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य केले जावे.शिक्षकांचे हक्क मिळवून देण्यासाठी गौतम कांबळे यांच्या तसेच अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी सांगितले.

तसेच उर्वरित निवडी आधिवेशनात केल्या जातील असे कांबळे यांनी सांगितले.

Previous articleराष्ट्रपती पदकासह ५८ पदकविजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Next articleउरुळी कांचन येथे कोरोनामुळे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यु