भिमानदीवर कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात ; आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन

राजगुरूनगर – दावडी (डुंबरेवस्ती ) ते काळूस(माळवाडी) दरम्यान होणाऱ्या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

पूर्वभागातील सर्वात मोठ गाव दावडी व काळूस ओळखलं जातं.याच दोन्ही गावाच्या मध्यभागातून भीमानदी वाहत जाती.पण बंधारा नसल्याने पाण्यासाठा होत नव्हता.मार्च ते जून महिन्यात माळवाडी,डुंबरेवस्ती,खैरेवस्ती,होरेवस्ती, दिघे-खेसे वस्ती या भागातील या बंधाऱ्यचा फायदा होणार आहे.जवळपास 40 वर्षांपासून बंधाऱ्यांची खूप मागणी होती.पण आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयनातून हा बंधारा होत आहे.यामुळे चाकण ते काळूस ते दावडी ते धामनटेक या मार्ग पण दळण-वळण होण्यास चालना मिळणार आहे.हा बंधारा होवा म्हूणन काळूस ग्रामपंचायत व दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने वर्षांनुव- वर्षं पाठपुरावा करून त्याला आता यश आले आहे.या पासून शेतमालाला पाण्याचा तुटवडा भासनार नाही. दळणवळण साठीचे लागणारे अंतर कमी होऊल.या नवीन बंधाऱ्यामुळे शेतकरी वर्गात मोठा आनंद आहे. या बंधाऱ्याला 1कोटी 10 लाख रुपये उपलब्ध झाले आहे. यामुळे जवळपास 700 ते 900 एकर जमीनीला पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे.मा पंचायत समिती सभापती अरुण चौधरी, बाजारसमिती विनायक घुमटकर,तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष कैलास सांडभोर,मयूर मोहिते, दावडी सरपंच राणी डुंबरे पाटील,काळूस सरपंच धनश्री पवळे, मा उपसरपंच बाळासो खैरे,दावडीचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे पाटील,मा सरपंच गणेश पवळे,मा उपसरपंच हिरामण खेसे,उपसरपंच अनिल नेटके, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा होरे,माधुरी खेसे,धनश्री कान्हूरकर,प्रियंका गव्हाणे, मेघना ववले, संगीता मैंद,वृषाली खैरे, संदीप टेमगिरे,मा सरपंच भरत गायकवाड, सुभाष गायकवाड,जिल्हा संधारण अधिकारी-महेंद्र बोरसे,व दावडी-काळूस भागतील शेतकरीवर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

नवीन दावडी(डुंबरेवस्ती)-काळूस बंधाऱ्यामुळे दावडील शेतकऱ्यांना मूलभक पाणी व चाकणला जाण्याचा मार्ग सोपा झाला.- राणी डुंबरे पाटील -सरपंच दावडी

वर्षनुवर्षे पाठपुरावा केल्यान या नवीन बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येणार आहे. शेतीमाल उपन्न मोठ्या प्रमाणात होणार आहे.-बाळासाहेब खैरे-मा सरपंच काळूस

Previous articleबाळासाहेब कुंजीर यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleस्व. शांताराम भोंडवे यांच्या हरित दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आजही पर्यावरण दृष्ट्या समृद्ध – श्रीनिवास पाटील