बाळासाहेब कुंजीर यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड

उरुळी कांचन

वळती (ता.हवेली) येथील बाळासाहेब महादेव कुंजीर यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी निवड केली.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक माणिकराव गोते, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सुरेखा भोरडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, संजय गांधी निराधार योजना हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, माजी सरपंच आण्णा महाडिक, हवेली तालुका उपाध्यक्ष विजय तुपे, शहर अध्यक्ष रामभाऊ तुपे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास चौधरी, हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे गुलाब चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका ओबीसी सेल अध्यक्ष सुभाष टिळेकर, माजी संचालक रघुनाथ चौधरी, अर्जुन कांचन, स्वराज्य तुपे, अनिकेत तुपे, आदी उपस्थित होते.

पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडणार आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे काम केले आहे असे मत बाळासाहेब कुंजीर यांनी सांगितले.

Previous articleकवठे येमाईत भीम जयंती ऊत्साहात साजरी
Next articleभिमानदीवर कोल्हापूरी बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात ; आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन