नारायणगाव महाविद्यालयातील रचना हांडे यांना पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक जाहीर

नारायणगाव ( किरण वाजगे)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत मे- २०२० मध्ये झालेल्या एम.ए. परीक्षांमधील मिळालेले मानांकन नुकतेच जाहीर झाले आहे. यामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील रचना सुभाष हांडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम. ए. ( अर्थशास्त्र ) परीक्षेत प्रथम आल्याबद्दल विविध सुवर्ण पदके जाहीर झाली आहेत.

यामध्ये श्री यशवंतराव चव्हाण स्मृती सुवर्ण पदक , इंदिराबाई कुलकर्णी सुवर्ण पदक आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर सुवर्णपदक ही तीनही सुवर्ण पदके मे २०२० परीक्षा अंतर्गत रचना हांडे यांना जाहीर झाल्याचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी सांगितले.
या यशस्वी कामगिरीबद्दल ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर , संचालक डॉ.आनंद कुलकर्णी, अरविंद मेहेर व प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी हांडे यांचे विशेष कौतुक केले.

तसेच ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे सर्व संचालक मंडळ व प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी यांनी देखील रचना हांडे यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील एम. ए. अर्थशास्त्र हा विभाग वर्ष २००४-०५ पासून कार्यरत असून या विभागातील विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. जी. बी. होले, प्रा.आकाश कांबळे प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर व प्रा. गजानन जगताप यांचे रचना हांडे या विद्यार्थिनीस विशेष मार्गदर्शन लाभले.विद्यापीठाच्या मे २०२० मधील झालेल्या परीक्षेत प्रथम आल्याबद्दल जाहीर झालेल्या सुवर्ण पदक प्राप्तीबद्दल महाविद्यालयातील विविध विभागांच्या वतीने देखील रचना हांडे यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

Previous articleआनंदी व प्रसन्न राहण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज – मानसशास्त्रज्ञ योगिता अडसरे
Next articleअखेर शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; हडपसर ते तीर्थक्षेत्र रामदरा बससेवा सुरू