पाटस मध्ये १ कोटी १५ लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन

योगेश राऊत

पाटस (ता.दौंड) ग्रामपंचायतच्या वतीने खासदार निधी, जिल्हा परिषद निधी , पंचायत समिती निधी व ग्रामपंचायत निधीद्वारे पाटस गावातील भानोबा नगर ,आव्हाड नगर, योगेंद्र नगर ,पंचशील नगर, डोंगरेश्वर , पाथरशेत , शितोळे वस्ती ,पुनर्वसन, भानोबा वस्ती, घोलेवस्ती, 27 फाटा, खारतुडे वस्ती , म्हस्केवस्ती येथील अनेक विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

या वेळी पाटस गावचे माजी सरपंच योगेंद्र बाबा शितोळे ,भीमा सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन सत्वशील भाऊ शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत तात्या शितोळे , भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिक आबा भागवत, समाज कल्याण माजी सभापती सारिका ताई पानसरे , माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी ताई चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती आशाताई शितोळे ,ग्रामपंचायत मा. उपसरपंच शिवाजी बापू ढमाले,दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सागर शितोळे पाटील, ग्रामपंचायत मा सदस्य आण्णा तांबे, संतोष वरघडे ,पाटस ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अवंतिका ताई शितोळे उपसरपंच छगन तात्या म्हस्के तसेच सर्व पाटस ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .

Previous articleआळे गावात आढळली बिबट्याची पिल्ले ; ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणी केली बंद
Next articleमराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश