माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिला तीन लाखाचा व्हरांडा

योगेश राऊत ,पाटस

पाटस (ता.दौंड) येथील रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय व कै मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्य. विद्यालयातील  १९८८ सालातील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ३ लाख रुपये खर्च करून ५०० स्क्वेअर फुट व्हरांडा बांधून दिला. या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री नामदेवनाना शितोळे, स्कूल कमिटी सदस्य योगेंद्र बाबा शितोळे व सितारामतात्या भागवत, सरपंच सौ. अवंतिकाताई शितोळे, श्री सत्वशीलभाऊ शितोळे, श्री प्रशांततात्या शितोळे, सौ छायाताई भागवत, मेमाने सर आणि १९८८ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी व रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ माजी विद्यार्थी, पालक व सर्व सेवक हीच प्रत्येक शाळेची सर्वात मोठी ताकद असते तसेच याचा आदर्श इतर माझी विद्यार्थ्यांनी घेऊन आपल्या शाळेचे नावलौकिक करावे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले १९८८ बॅच च्या सर्वांचे आभार आणि सर्वांचे असेच सहकार्य राहावे ही अपेक्षा उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.

Previous articleपाटस येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकवठे विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व.