जुन्नर तालुक्यात हरितसंकल्पाची गुढी

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते. याच माध्यमातून जुन्नर शहरात तनिष्का व्यासपीठाने यंदा १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. गतकाळात विकासाच्या दृष्टीने असंख्य सामाजिक, आरोग्यविषयक, मनोरंजनात्मक , प्रबोधनात्मक उपक्रम जुन्नर तनिष्का गटाने राबवून यशोगाथा निर्माण केल्या. समाजापुढे आदर्श निर्माण करत स्त्री प्रतिष्ठेची पताका जगभरात पोहचवली. अशी माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली.तनिष्का व्यासपीठ वर्धापनदिना निमित्ताने गुढी पाडव्याला गटातील सदस्यांनी स्त्री प्रतिष्ठेची गुढी आवर्जून उभारली.

यावेळी समाजाच्या कल्याणासाठी हरित संकल्प करत त्यांची मुहूर्तमेढ कडुनिंबाचे रोपटे प्रत्येकीने लावून केली. त्याबरोबरच स्त्री प्रतिष्ठा जपण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी जुन्नर वनविभागाचे वनक्षेत्रपाल अजीत शिंदे यांनी कडूलिंबाची रोपे उपलब्ध करून दिली.गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी पुढील काळातही सामाजिक हित जपण्याचा मनोदय व्यक्त केला.

दहा वर्षांतील उपक्रमांचा आढावा तनिष्का ऊर्मिला थोरवे यांनी घेतला, सुनिता वामन , श्रुतिका बुट्टे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महानंदा हिरेमठ, माधुरी म्हसकर, पूनम तांबे, अनिता काजळे, सरिता कलढोणे, छाया शेवाळे, कांचन वाडकर, दीपाली भास्कर, पुष्पा बुट्टे पाटील, सुवर्णा मेहेर, भारती शेटे, छाया वाळुंज, आशा केदारी, प्रतिभा केदारी , शेफाली शेवाळे, सुनिता राशीनकर, तबस्सुम पटेल आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

Previous articleगृहमंत्री श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांचा कवठे येमाई येथे जनता दरबार
Next articleकेबल व कृषीपंप चोरी करणारी टोळी जेरबंद – गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई