गृहमंत्री श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांचा कवठे येमाई येथे जनता दरबार

कवठे येमाई (धनंजय साळवे)-  सोमवार,दि-4/4/22 रोजी शेतकरी मेळावा व सर्व लोकांच्या विविध अडचणी निवारण करण्याकामी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.नामदार श्री.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी आमदार श्री.पोपटराव गावडे साहेब कवठे या ठिकाणी उपस्थित होते .यावेळी अनेक शेतकरी व लोकांनी आपल्या अडचणी  त्यांना सांगितल्या. आपले लेखी किंवा तोंडी निवेदने सादर केले .यावेळी सर्व तक्रार व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले व गावाला भरगोस मदतीचे आश्वासन दिले.याप्रसंगी युवानेते राजुशेठ सांडभोर यांना श्री.दिलिपरावजी वळसे पाटील यांनी वाढदिवसाच्या आवर्जून शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला मा.आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे मा.चेअरमन देवदत्तजी निकम, .पं.सदस्य सुदामभाऊ ईचके,युवा नेते बाळासाहेब डांगे,घोडगंगा संचालक राजेंद्र गावडे,,जि.प.सदस्या सुनिताताई गावडे,.पं.सदस्या अरुणाताई घोडे,सरपंच दामुशेठ घोडे,मा.सरपंच दिपकभाऊ रत्नपारखी,मा.सरपंच अरुण मुंजाळ, युवानेते विलास बच्चे,युवानेते कैलास बच्चे, युवा नेते अशोक गावडे.सा.का.अशोक गाडेकर,सा.का.जानकु मुंजाळ,अरुणशेठ वागदरे,लोकमत पत्रकार शरिफभाई मोमिन,राष्ट्रवादी सरचिटणीस पवनराजे जाधव,दत्ताशेठ घोडे, प्रतिक गाडेकर.,सा.का.मिठ्ठुशेठ बाफना,निलेशशेठ पोकळे,येस क्लब अध्यक्ष नवनाथ सांडभोर उपाध्यक्ष डाँ ‌उचाळे ई.मान्यवर उपस्थित होते   ह्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कवठे येमाई यांजकडुुन बालाजी मंगल कार्यालय कवठे येथे करण्यांत आले.

Previous articleथिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी चे प्रा.अमोल शहा यांच्याकडुन पाबळ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन
Next articleजुन्नर तालुक्यात हरितसंकल्पाची गुढी