बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री यांच्या समवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची बैठक

Ad 1

अमोल भोसले-बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत आज राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच मंत्रिमहोदय सुनिल केदार, महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करुन सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत.

या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरुटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.