बिबट सफारी झाल्यास जुन्नर तालुक्याचा कायापालट – रवींद्र मिर्लेकर

नारायणगाव : (किरण वाजगे) – बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होण्यासाठी माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांचे खूप मोठं योगदान असून जुन्नर तालुक्याचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते रवींद मिर्लेकर यांनी चाळकवाडी ( ता जुन्नर ) या ठिकाणी केले.

जुन्नर तालुक्यात बिबट सफारी व्हावी या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे नुकतेच चार दिवस उपोषण केले होते. या उपोषणादरम्यान त्यांची तब्बेत खालाविल्यानंतर त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले होते. हे समजताच आज त्यांना भेटण्यासाठी आणि बिबट सफारी बाबत चर्चा करण्यासाठी रवींद मिर्लेकर यांनी सोनवणे यांच्या रायगड या निवासस्थानी भेट घेऊन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे ,
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, युवा सेनेचे गणेश कवडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिर्लेकर म्हणाले की, जुन्नर तालुक्यात खोडद येथे जागतिक स्तरावरील सर्वात मोठी जी.एम.आर.टी. ही दुर्बिण आहे. त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही. त्याच बरोबर जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी बिबट सफारी व्हावी ही संकल्पना शरद सोनवणे यांनी २०१६ साली मांडली. परंतु त्याचा पाठपुरावा योग्य त्या मार्गाने होत नसल्यामुळे जनतेच्या मागणीसाठी आणि जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने या प्रकल्पास चालना देण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी स्वपक्षाचे सरकार असतानाही आंदोलन केले.

त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली व तरुणांमध्ये संवेदना निर्माण झाली. ती फार सकारात्मक पद्धतीने सरकाने मनावर घेतली आहे. बिबटे जास्त झाले म्हणून त्यांना बंदिस्त ठेवण्यासाठी हा प्रकल्प नाही तर पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे मिर्लेकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जुन्नरचे माजी आमदार व शिवसेना तालुका प्रमुख शरद सोनवणे यांनी सांगितले की, बिबट सफारी हा जुन्नरच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि जुन्नरच्या अस्मितेसाठी आपण संघर्ष करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत तसेच रवींद मिर्लेकर यांचे आभार मानले.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात जिल्हास्तरीय जल – साक्षरता कार्य शाळा उत्साहात संपन्न
Next articleशरद पवार यांच्या उपस्थित माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न