विद्युत क्षेत्रातील खाजगी करण्याच्या विरोधात कामगार महासंघ रस्त्यावर

कुरकुंभ : सुरेश बागल

पुणे परिमंडळ रास्ता पेठ येथे निदर्शने व द्वारसभा महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच कंपनी प्रशासनाच्या धोरणात्मक एकतर्फी बदल आणि होवू घातलेल्या विभाजन व खाजगीकरण विरोधात पुणे परीमंडळ प्रशासकीय इमारतीसमोर दि.२२-०३-२०२२ रोजी दुपारी महाराष्ट्र विज कामगार महासंघ (भारतीयं मजदूर संघ) ची त्रिव निदर्शने द्वार सभा झाली.या द्वार सभेस पुणे परीमंडळातील कामगार महासंघाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर द्वारसभेस कामगार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री श्री विजय हिंगमिरे यांनी संबोधित केले. संबोधित करताना श्री हिंगमिरे यांनी प्रशासनाच्या कारभारावर सडकून टिका केली.तसेच शासनाने प्रादेशिक कार्यालयासारख्या अनावश्यक कार्यलयांची निर्मिती करून त्यावर करोंडो रूपयांचा नाहक खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व कंपनी या पांढऱ्या हत्तीस पोसण्याचे चे काम करत असल्याचे हिंगमीरे यांनी सांगितले.

तसेच सदर द्वारसभेस पुणे प्रादेशिक कार्यालय अध्यक्ष श्री. तुकाराम डिंबळे यांनी आपण संघर्ष समितीमध्ये का सामील नाही?याचे विश्लेषण करून तळागाळातील सभासदांच्या शंकांचे निरसन केले.तसेच संघर्ष समितीलादेखील भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या कामगार महासंघास कमी लेखू नका व आम्हाला ग्रुहित धरून फक्त तुम्ही घेतलेल्या निर्णयावर आम्हाला सही करण्यास बोलवू नका असे डिंबळे यांनी सांगितले.महापारेषण कंपनीच्या कामगारांच्या वतीने कार्याध्यक्ष श्री विश्वास भैरवकर यांनी पारेषण कंपनीतील प्रलंबित प्रश्नांची सूची सादर करून ते मार्गी लागावेत यासाठी प्रशासनास आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे या द्वार सभेस महिला सभासदांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.महिला सदस्यांना संबोधित करताना प्रदेश उपाध्यक्षा सौ.रोहिणी पाटसकर यांनी महिलांना एकत्र येण्याचे आवाहन केले.तसेच महिलांच्या प्रश्नांबाबत व त्यांच्या निवारणासाठी महिलांना असलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून अन्यायाचा प्रतिकार करावा असे आवहान केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश पदाधिकारी अध्यक्ष श्री नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, राहूल बोडके, उमेश आणेराव, सागर पवार , विभागीय पदाधिकारी सुमीत कांबळे, प्रविण पवार हे पदाधिकारी व सभासद तसेच ज्येष्ठ नागरीक संघ व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.ज्येष्ठ नागरीक संघाचे श्री भांडारकर यांनी ज्येष्ठांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री निलेश खरात यांनी त्यांच्या मनोगतात कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आवाहन करून दि.२१-०३-२०२२ रोजी मुंबई येथील आंदोलनाची माहिती सादर केली.

तसेच या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष श्री अविनाश देशमुख व कार्यसमिती सदस्य श्री मुकुंद त्र्यंबके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून प्रशासनास भविष्यकाळात कामगारांचे प्रश्नांबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.

तसेच सदर प्रसंगी गणेशखिंड सर्कल सचीव श्री शेखर मारणे,रास्तापेठ सर्कल सचीव श्री महेंद्र खिरोडकर,पारेषण सचीव श्री राजु साळवे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तसेच ही द्वार सभा यशस्वी होण्यासाठी पुणे परीमंडळ उपाध्यक्ष श्री अरूण महाले,वितरण कार्याध्यक्ष सुनिल सोमवंशी,श्री शरद संत,ज्येष्ठ मार्गदर्शक श्री विजयराव मुळगुंद ,धनंजय ईनामदार,त्याचप्रमाणे सुभाष सावजी,भरत अभंग,खंडू हटकर,सुनिल बोंगाळे, स्वामी,यांचीदेखील उपस्थिती होती.
तसेच या द्वारसभेस भारतीय मजदूर संघ,पुणे जिल्हाध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले .श्री चव्हाण यांनी भारतीय मजदूर संघाची ध्येय धोरणे यांची मीहिती देवून कामगारांच्या बाबतीत भविष्यकाळातील भूमिका स्पष्ट केली.

द्वारसभेच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे परीमंडळाचे सचीव श्री सुरेश जाधव इ. पुणे परिमंडळ संघटनमंत्री श्री संजय नायकवडी व असंतोष जाणीव करून दिली,या बाबतीत शासनाने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास त्रिव आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.

कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना भगव्या टोप्या व भगवे झेंडे वाटप करण्यात आले.सदर जबाबदारी रास्तापेठ अध्यक्ष श्री विजय जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.कार्यक्रमाची सांगता ग्रामीण सर्कल सचीव श्री धनंजय भड यांनी केली.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे परीमंडळ सचीव श्री सुरेश जाधव,पुणे परीमंडळ अध्यक्ष श्री ञानेश्वर माने तसेच पुणे परीमंडळातील सर्वच स्तरावरील पदाधिकारी व सभासद यांनी केले.

Previous articleक्रांतिवीर राजगुरू चरित्र पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
Next articleराजगुरूनगरच्या तरूणांची पक्षी सवंर्धनासाठी जन जागृती