क्रांतिवीर राजगुरू चरित्र पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

राजगुरूनगर – भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष तसेच शहीद राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या ९१ व्या शहीद दिनानिमित्त येथील बस स्थानक परिसरातील हुतात्मा स्मृती स्थळ येथे हुतात्मा राजगुरू चरित्र क्रांतिवीर राजगुरू या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.ज्येष्ठ लेखक दिपकांत राक्षे यांच्या हुतात्मा राजगुरू जीवन चरित्राची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

येथील ज्येष्ठ इतिहासंशोधक पांडुरंग बलकवडे, उस्मानाबाद येथील लेखक केतन पुरी ,लेखक दीपकांत राक्षे ,प्रकाशक दिव्या दत्तात्रय दगडे,राजगुरूनगर नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे ,प्रकाशक संतोष गाढवे,विश्व हिंदू परिषद केंद्रीय सदस्य दादा वेदक ,पंजाब येथील देशभक्त विजय सागर,हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन अध्यक्ष ऍड मनीषा पवळे, उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर मधुकर गिलबिले , डॉ .नीलम गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले.

गेली अनेक वर्षे हुतात्मा राजगुरू चरित्र वाचकांना मिळत नसल्याने ही गरज ओळखून हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन संस्थेने या कामी पुढाकार घेतला.पुस्तक प्रकाशन कामी लोक वर्गणी जमा करण्यात आली.

यावेळी शहीद भगतसिंग पुस्तकाचे लेखक केतन पुरी यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकला.इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्रातील देशभक्त क्रांतिकारक यांचे कार्य तसेच छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा गौरव केला.अश्विनी राक्षे,संतोष गाढवे,दत्तात्रय दगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुटे पाटील,बाबाजी काळे,शिव सेना महिला आघाडीच्या विजया ताई शिंदे, ॲड गणेश सांडभोर,स्वराज्य संघ राज्य अध्यक्ष बाजीराव बांगर महाराज हुतात्मा बाबू गेनु यांचे पुतणे मारुती सैद बाबू गेणू,प्रतिष्ठान अध्यक्ष बाबाजी चासकर लेखक बी.के कदम,डी.के.वडगावकर, पुणे येथील मुखपृष्ठकार प्रभाकर भोसले, राहुल गोरे ,यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी पुस्तकास देणगी दिलेल्या देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला.

हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलास दुधाळे ,अमर टाटीया , ,मीनाक्षी पाटोळे,दिलीप होले,संतोष सांडभोर, ॲड सुनील वाळुंज,राहुल वाळुंज,उत्तम राक्षे,नाजनिन शेख,संगीताताई तनपुरे,डॉ.वंदना शेवाळे,यांनी कार्यक्रम संयोजन केले.प्रास्ताविक मधुकर गिलबिले गुरुजी यांनी केले,सूत्र संचालन सूर्यकांत मुंगसे सर यांनी केले.आभार ॲड .मनीषा पवळे यांनी मानले.

Previous articleबाळकृष्ण काकडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलच्या उपाध्यक्षपदी निवड
Next articleविद्युत क्षेत्रातील खाजगी करण्याच्या विरोधात कामगार महासंघ रस्त्यावर