बाळकृष्ण काकडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलच्या उपाध्यक्षपदी निवड

उरुळी कांचन

येथील बाळकृष्ण दादुराव काकडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलच्या उपाध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष सोनबा चौधरी यांनी केली निवड. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुरेश कांचन, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश वाळेकर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार अशोक पवार, खासदार डॉ अमोल कोल्हे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रदिप गारटकर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर स्थानिक पातळीवरील जिल्हा तालुका वरील पदाधिकारी हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरीकांच्या ज्या समस्या असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत वृद्धांना सामावून घेतले जायचे. आता विभक्त कुटुंब पद्धतीत लहान जागा, मर्यादित कुटुंब, नोकरीच्या बदलत्या जागा, परदेशातील वास्तव्य यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघाली. त्याचा सर्वांत मोठा तोटा ज्येष्ठ नागरिकांना झाला असल्याचे मत नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण दादुराव काकडे यांनी सांगितले.

Previous articleपुण्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
Next articleक्रांतिवीर राजगुरू चरित्र पुस्तकाचे प्रकाशन संपन्न