किवळे येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न : तरुणांसह महिलांचा सहभाग उल्लेखनीय

चाकण-छत्रपती शिवाजी महाराज यांचे, चारित्र्याचे, इतिहासाचे, हिंदू धर्माचे महत्व तसेच हिंदवी स्वराज्यातील सर्व मावळ्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे, समाजाला व येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी असा इतिहास समजावा, गडकिल्यांचे महत्व जनमाणसांना समजावे.
या हेतूने हिंदूवीर प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा, साजरा करीत आहे. ढोल ताशांचा गजर,एल सी डी स्क्रीन, तसेच डी. जे वर शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित गाण्यांवर, श्रींची मिरवणूक काढण्यात आली होती.

किवळे गावातील जिल्हा परिषद शाळेतील लहान शिवभक्त आणि शिवकन्या यांची, शिवरायांच्या जीवनावर भाषणे झाली.
कुमारी दुर्गसेविका देवांशी वाघ ह्या चिमुकली ने गारदेने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.

कवीवर्य गजानन उफाडे यांची शिवरायांवर कविता झाली, हिंदूवीर प्रतिष्ठानचे युवा स्वयंसेवक भरत कड यांचा स्वलिखित आणि स्वतःचा मधुर आवाजात पोवाडा सादर करण्यात आला. तसेच हिंदूवीर प्रतिष्ठान यांचा, वार्षिक कामांचा अहवाल आढावा, व्हिडिओ द्वारे सादर करण्यात आला. त्याप्रमाणे हिंदू वीर प्रतिष्ठान तर्फे सह्याद्री प्रतिष्ठान यांना गडकोट संवर्धन मोहिमेसाठी निधी अर्पण करण्यात आला.

त्यानंतर शिव शंभू कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांचे, मधुर वाणीने झालेली किर्तनसेवा, शिवचरित्र कीर्तनाने सारा श्रोतावर्ग शिवमय झाला होता. बांगर महाराजांनी शिवकालीन अनेक घटनांचे दाखले देत, वर्तमानकाळात शिवरायांचे चरित्र कसे मार्गदर्शन ठरते, याचे विवेचन केले.कार्यक्रमासाठी वारकरी सांप्रदाय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच ह्या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,आणि हिंदूराष्ट्र सेना अशा हिंदुत्ववादी संघटना यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहीती प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल राऊत , प्रास्ताविक स्वप्निलजी साळुंके तर आभार संभाजी कड यांनी मानले.

Previous articleपी के टेक्निकल कॅम्पस मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
Next articleस्कॉटिश कड्यावरून क्रांतीकारकांना वंदन