पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

चाकण : पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये 14 मार्च ते 19 मार्च 2022 दरम्यान क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी पी के टेक्निकल कॅम्पस तर्फे दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी 14 ते 18 मार्च दरम्यान आंतर महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व 19 मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अर्थात “उत्सव 2022” ने कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रम प्रसंगी पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रतापराव खांडेभराड,उपाध्यक्ष श्री.अंकुशशेठ नाणेकर,सचिव सौ.नंदाताई खांडेभराड, प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार मा.महेशदादा लांडगे, अण्णासाहेब मगर बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मा. नंदुशेठ लांडे,नादखुळा गीत फेम पी के ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थिनी,अभिनेत्री प्रतिभा जोशी, सुप्रसिद्ध निवेदक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कोकाटे, उद्योजक श्री. दत्ताशेठ खांडेभराड उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी लावलेल्या शैक्षणिक संकुलरुपी रोपट्याचा वटवृक्ष होत असताना हे विद्यार्थी समाज आणि देशाची सेवा करण्यामध्ये अग्रणी भूमिका निभावतील असे प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार श्री महेशदादा लांडगे यांनी केले तर पी के ज्युनिअर कॉलेज हे अभ्यासाबरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाला चालना देणारे पुणे परिसरातील एकमेव महाविद्यालय असल्याचे अभिनेत्री प्रतिभा जोशी यांनी नमूद केले. पी के टेक्निकल कॅम्पस द्वारे सर्व शैक्षणिक सुविधा यापुढील काळातही उपलब्ध केल्या जातील मात्र विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रविण्याबरोबरच उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पी के टेक्निकल कॅम्पस च्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केले आहे अशा विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन कॉलेजतर्फे गौरवण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

सर्व विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Previous articleवाघोलीच्या बी.जे.एस विद्यालयास सर्वगुणसंपन्न शाळा तर शिक्षक अशोक स्वामी यांना उपक्रमशील शिक्षक व प्रवीण डोशी यांना गुणवंत सेवक पुरस्कार प्रदान
Next articleकिवळे येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न : तरुणांसह महिलांचा सहभाग उल्लेखनीय