वाघोलीच्या बी.जे.एस विद्यालयास सर्वगुणसंपन्न शाळा तर शिक्षक अशोक स्वामी यांना उपक्रमशील शिक्षक व प्रवीण डोशी यांना गुणवंत सेवक पुरस्कार प्रदान

गणेश सातव, वाघोली

वाघोलीच्या भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयास हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे यांच्या हस्ते सर्वगुणसंपन्न शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.प्राचार्य संतोष भंडारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये स्टेम लॅब प्रकल्प, रोबोटिक्स स्पर्धा, राष्ट्रीय शिष्यवृत्ती स्पर्धा, स्कॉलरशिप, विविध प्रदर्शने विविध खेळांच्या स्पर्धा तसेच एनसीसीचे मार्गदर्शन केले जाते व यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.

विद्यालयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आदिवासी मुले, मेळघाटातील मुले यांना मोफत शिक्षण व राहण्याची सर्व सुविधा पुरविली जाते व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जाते. त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षक अशोक स्वामी यांना उपक्रम शील शिक्षक व प्रवीण डोशी यांना गुणवंत सेवक पुरस्कार प्राप्त झाले.

अशोक स्वामी यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सुमारे पाच लाखाहून अधिक शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे. तसेच एनसीसी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास त्यांचे मार्फत घडविला जातो. तसेच विद्यालयातील प्रवीण डोशी यांना गुणवंत सेवक पुरस्कार प्राप्त झालेला आहे विविध उपक्रम उपक्रमांमध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो.यावेळेस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे व विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग पवार उपस्थित होते.

Previous articleबीजेएस विद्यालयात सुसज्ज आधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न
Next articleपी के टेक्निकल कॅम्पस मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन