पिंपरी सांडस सोसायटीला पीडीसीसी बँकेच्या वतीने ढाल भेट

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल हवेली तालुक्यातुन एकमेव संस्थेची निवड झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची ढाल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा दिंगबर दुर्गाडे यांच्या हस्ते देण्यात आली असल्याची माहिती सोसायटीचे संचालक नवनाथ वायकर यांनी दिली.

याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती दिलीप काळभोर तसेच विभागीय आधिकारी नरेश शिरसाम, सिनियर ऑफिसर तुषार मोकाशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नंदुपाटिल काळभोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत काळभोर यांच्या उपस्थित देण्यात आले.

पिंपरी सांडस विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतिष भोरडे, संचालक नवनाथ वायकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल भोरडे, दत्तात्रय भोरडे, सोसायटीचे सचिव संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous articleमुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी पा़ंडुरंग मुंजाळ
Next articleनारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय