मुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी पा़ंडुरंग मुंजाळ

धनंजय साळवे

कवठे येमाई – बापूसाहेब गावडे विविध कार्यकारी सोसायटी मुंजाळवाडी चेअरमन पदी राष्ट्रवादीचे श्री. पांडुरंग गोविंद मुंजाळ व व्हा.चेअरमन पदी श्री.सोपान मारुती देवकर यांची निवड झाली.अतिशय उत्सुकता असलेल्या मुंजाळवाडी सोसायटी ची निवडणुक पार पडली.यावेळी काहिसा तणाव जाणवत होता.कोणत्या पक्षांच्या उमेदवारांच्या गळ्यात पडेल या बद्दल उत्सुकता होती. परंतु राष्ट्रवादीने आपल्या बाजुने विजय मिळवला. फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.

विजयी उमेदवारांचे मा.श्री.आमदार पोपटराव गावडे ,घोडगंगा कारखान्याचे संचालक श्री.राजुशेठ गावडे.मा.पं.सदस्य श्री. सुदामभाऊ गावडे,युवानेते श्री.बाळासाहेब डांगे यांनी अभिनंदन केले.निवडणुक अधिकारी म्हणून श्री.के.डी.मोरे व सचिव श्री. अर्जन बुधाजी शिंदे यांनी काम पाहीले.

Previous articleअकरावीत शिकणाऱ्या आदित्यचा भन्नाट प्रयोग
Next articleपिंपरी सांडस सोसायटीला पीडीसीसी बँकेच्या वतीने ढाल भेट