मल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालयाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, मल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव दूंदा केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार संलग्नित शारीरिक शिक्षण क्रीडा क्षेत्रात काम करणारी संघटना (PEFI)दिल्ली यांनी राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दि.११मार्च २०२२ रोजी नगरपालिका भवन,संसद मार्ग, नवी दिल्ली येथे स्पोर्ट्स अॕथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक संदीप प्रधान यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित केले आहे.

या पुरस्कारासाठी भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व गोवा या पाच राज्यातुन या पुरस्कारासाठी दोन व्यक्तींची निवड करण्यात येते. प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना या वर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. प्रा. डॉ. भिमराव केंगले हे आंबेगाव तालुक्यातील जांभोरी या गावचे रहिवासी आहेत, त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेश काळे,उपाध्यक्ष श्री.तुकाराम काळे,कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंद काळे,खजिनदार श्री.शिवदास काळे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. संजय आर्विकर,प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव,उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.भाऊसाहेब थोरात,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleकोरोना योद्धांना सेवेत कायम करावे,न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर- भारतीय मजदूर संघाचा इशारा
Next articleस्व.माणिकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस एम देशमुख यांची घोषणा