दुकानाच्या जागेच्या वादातून ६३ वर्षीय बहिणीला भावाने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

Ad 1

प्रमोद दांगट– कळंब (ता.आंबेगाव) येथील दुकानाच्या जागेच्या वादावरुन ६३ वर्षीय बहिणीला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी भाऊ,भावजय,भावाचा मुलगा,मुलगी आणि इतर ३ ते ४ जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथील दुकान अभिनय जनरल स्टोअर्स या दुकानाच्या जागेच्या कारणावरुन कोर्टात दावा चालु आहे.या कारणावरुन फिर्यादी महिलेचा भाऊ आणि त्याच्या घरातील इतर वारंवार फिर्यादी महिलेस शिविगाळ करत असतात.मंगळवार दि.११ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी महिला अभिनय जनरल स्टोअर्स दुकानात असताना भाऊ सुदाम बबन भालेराव,भावजय मालती सुदाम भालेराव,भाचा मयुर,भाची अनामिका आणि इतर तीन ते चार असे एकत्रात शिविगाळ करत दुुकानात घुसले.मालती हिने फिर्यादी महिलेचा हात धरुन दुकानाबाहेर ओढले.मयुर याने फिर्यादी महिलेची साडी ओढुन शिविगाळ केली.त्यावेळी फिर्यादी महिला ही शिविगाळ करु नका असे म्हटली असता भाचा मयुर म्हणाला दुकान आमचे आहे.तु दुकान खाली करुन निघुन जा.भावजय मालती हिने फिर्यादी महिलेला धक्का देवुन खाली पाडले.त्यावेळी भाऊ सुदाम,भावजय मालती,भाचा मयुर,भाची अनामिका यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.इतर तीन ते चार जणांनी दुकानातील साहित्य दुकानाच्या बोहर फेकुन देवुन नुकसान केले.तसेच दुकानात असलेला इलेक्ट्रिक मीटर तोडुन नुकसान केले.तु आमच्या नादाला लागली तर जीवे मारुन टाकु.अशी धमकी दिली आहे.याप्रकरणी संबधितांच्या विरोधात विनयभंग, मारहाण,दुकानातील साहित्याची नासधुस याप्रमाणे मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस जवान अजित मडके करत आहे.

जाहिरात