कोरोना योद्धांना सेवेत कायम करावे,न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर- भारतीय मजदूर संघाचा इशारा

सुरेश बागल,कुरकुंभ

कोरोना योद्धांना सेवेत कायम करावे, न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर, भारतीय मजदूर संघाचा इशारा
कोरोना महामारी वर मात करण्यासाठी सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या आरोग्य विभागात हजारो जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर कोरोना महामारी वर मात करण्यासाठी जीवावर उदार होऊन काम केलेल्या कामगार, कर्मचारानांचे समावेशन करावे व कोणत्या ही कामगारांना कामावरून कमी करू नये अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने शासनाकडे केली आहे.

या मागणी चा सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील विविध जिल्हा मध्ये रस्ता वर उतरून त्रिव आंदोलन करावे लागेल असा ईशारा संघटनेचे सरचिटणीस श्री दिपक कुलकर्णी यांनी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालय विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथे झालेल्या कामगारांच्या मेळावा मध्ये दिला आहे

मार्च २०२० पासून कोरोना महामारी ने ऊद्योग धंदे, व्यापार , वाहतूक, लाॅकडाऊन मध्ये ठप्प झाले होते. या अझात विषाणू च्या फैलावा मुळे शहरी, ग्रामीण भागातील लाखो व्यक्ती नागरिक भयभीत झाले होते. या महामारी वर मात करण्यासाठी प्रशासन पातळीवर मनुष्यबळ कमी पडल्याने प्रशासनाने महामारी वर नियंत्रण करण्या साठी जाहिराती व्दारे विहीत मार्गाने नर्सेस, प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,सहाय्यक प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,फार्मासिस्ट , चतुर्थ श्रेणी कामगार, वैद्यकीय अधिकारी ई नेमणूका केल्या होत्या. महामारी वर मात करण्यासाठी या सर्व कामगारांनी, कर्मचारींनी आपला जिव धोक्यात घालून स्वःताहाची, कुटुंबाची काळजी न करता समाज हिताचे महत्वपूर्ण काम केले आहे. याची जाणीव समाजाला नक्की च आहे. पण प्रशासन, शासनाला नाही. या कामगारांना कामगार कायद्या नुसार समान काम समान वेतन मिळणे आवश्यक असताना बहुतांश कामगारांना किमान वेतना पासून ही वंचित रहावे लागते आहे. शासनाच्या निर्णयानुसार या कामगारांना कोव्हीड भत्ता मिळणे आवश्यकअसताना ही तो अद्याप पर्यंत मिळालेला नाही. बहुतांश कामगारांना साप्ताहिक सुट्टी वा या बदली सुट्टी, ओव्हरटाईम वेतन भत्ता ही मिळाला नाही. कायदा नुसार भविष्य निर्वाह निधी चे अंशदान वजावट करणे आवश्यक असतानाही अंशदान रक्कम वजावट केली नाही. या मध्ये कार्यरत सेवेत असताना ज्या कामगारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या वारसांना अद्याप पर्यंत पर्यंत शासनाच्या लाल फीत कारभारा मुळे कायदेशीर संपुर्ण रक्कम मिळाली नाही, व मयत कामगारांच्या वारसास शासकीय नोकरीत देण्या बाबतीत ची घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. ज्या सेवकांना कामावर असताना अपघात झाला त्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. महिला कामगारांना प्रस्तुस्ती रजांचा लाभ मिळालेला नाही.

या सर्व समस्या ना वाचा फोडण्यासाठी सर्व कामगारांनी न्याय हक्कांसाठी राज्य, केंद्रीय स्तरावर आंदोलन करण्या साठी सज्ज रहावे असे आवहान अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) राष्ट्रीय सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना केले आहे.

या बाबतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने केंद सरकार व राज्य सरकार च्या प्रलंबित विषयांवर पत्र व्यवहार, पाठपुरावा बाबतीत सविस्तर माहिती श्री चंद्रकांत धुमाळ व रविंद्र देशपांडे यांनी सांगितले.
मेळावा चे अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा हे होते. श्री चव्हाण यांनी मेळावा चा समारोप केला.
या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस दीपक कुलकर्णी, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ केंद्रीय सदस्य चंद्रकांत धुमाळ, रविंद्र देशपांडे, महासंघाचे अध्यक्ष श्री संजय कांबळे, भागश्री बोरकर, अनिता पवार, मनिषा जरांडे ई मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन श्री संजय कांबळे महासंघाचे अध्यक्ष यांनी केले.

Previous articleभानोबानगरच्या शाळेला कुरकुंभ एमआडीसीतील कंपनीकडून पाणी शुद्धीकरण उपकरण भेट
Next articleमल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालयाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार