चाकण तळेगाव रस्त्याची दयनीय अवस्था

चाकण तळेगाव रस्त्यावर अक्षरशा खड्ड्यांची चाळण झाली आहे महाळुंगे येथील कला जनसेट कंपनी समोर मोठमोठे खड्डे पडले असून त्यांना तलावाचे स्वरूप आले आहेत.सरकारची अनेक आश्वासने फोल ठरली आहेत, नागरिक व प्रवासी रस्ता रुंदीकरण व  दुरुस्तीच्या प्रतिक्षेत. महाळुंगे येथे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर पडलेल्या खड्यात नागरिकांनी मोठी कसरत करावी लागत आहे पण रात्रीच्यावेळी अचानक समोर आलेल्या खड्डे वाहकांना दिसले नाही तर मोठा अपघात होऊ शकतो

चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे- खराबवाडी व परिसरातील  महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक दिवसांपासून हा रस्ता खड्डेमय झाला आहे जाणीव पूर्वक कि काय ह्या रस्त्याकडे संबधीत अधिकारी किंवा राजकीय नेते दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे .

चाकण तळेगाव राज्यमहामार्गावरील रस्त्यावर मोठ्या  प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी मोठ्या आकारातील खड्डे निर्माण झाले आहे.परिसरामध्ये मोठ मोठे खेड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.

यावर अनेक प्रवाश्यांनी आपला अनमोल जीव गमवला आहे. .कच्या स्वरूपाचे काम केल्याने पुन्हा यावर खड्डे पडले आहेत. यामुळे यापूर्वी अनेक अपघात मोठ मोठ्या भीषण स्वरुपाच्या घटना घडल्या असुन,महागड्या मोटार गाड्यांचे नुकसान होत आहे.या खड्डयांमळे रस्ता नेहमी जाम असतो. चाकण,खराबवाडी,महाळुंगे खालूंब्रे व येलावाडी गावाच्या हद्दीपर्यंत प्रवाशांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

हा रस्ता खूप वर्दळीचा आहे. या परिसराचे प्रचंड औद्योगीकरण झाले आहे या मुळे येथे सर्व प्रकारच्या वाहनांची खूप ये – जा झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने येथे रस्त्याचे डांबरीकरण उखडले जाते रस्त्याला वेळोवेळी डागडुजी करणे गरजेचे असते परंतु याकडे संबधीत अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्याच बरोबर या खड्ड्या मुळे वाहनांची गती मंदावते व हा रस्ता वारंवार जाम होतो प्रवाश्यांना तासंतास यामध्ये अडकून बसावे लागत आहे. ग्रामस्थ,कामगार तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
रस्त्याच्या कडाही खचून ठिकठिकाणी वाहनांसाठी अपघाती जागा तयार झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीने अनेकदा मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याची भावना लोकांमध्ये आहे..

Previous articleखानापूर केंद्रातील वीज बिल दुरूस्तीबाबत शिवसेनेच्या वतीने उप अभियंता यांना
Next articleदुकानाच्या जागेच्या वादातून ६३ वर्षीय बहिणीला भावाने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण