अष्टापुर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वाढदिवसाचा अनोखा उपक्रम

उरुळी कांचन

अष्टापुर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाचा अनोखा उपक्रम विज्ञान दिनापासून विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस मुलांना चॉकलेट न देता विद्यालयातील गरीब होतकरु हुशार विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन पेन्सिल कंपास इत्यादी साहित्य वस्तू स्वरुपात भेट दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आपुलकी मदत करण्याची वृत्ती निर्माण होते तसेच काही विद्यार्थी आपल्या वाढदिवसादिवशी विद्यालयातील ग्रंथालयासाठी पुस्तक भेट देतात. तेच पुस्तक त्याच वर्गातील विद्यार्थ्यास वाचन करण्यासाठी दिले जाते.

पुस्तकाचे वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते. विद्यालयातील उपशिक्षक श्री चौधरी सर यांनी सुचित केले की, ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्याला एक वृक्ष रोप भेट देण्यात येईल. ते वृक्ष रोप अष्टापुरचे मा.सरपंच आणि प्रासादिक दिंडी चे मा.अध्यक्ष कै. अण्णासाहेब सोपाना कोतवाल यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विकास आण्णासाहेब कोतवाल यांनी देण्याचे कबूल केले आहे. त्याप्रमाणे त्यांनी विद्यालयातील विद्यार्थीसाठी वृक्ष रोप भेट देत आहेत .

काल विद्यालय मध्ये इयत्ता ७ वी अ मधील विद्यार्थिनी कु. मानसी प्रदीप जगताप हिने वाढदिवसा निमित्त विद्यालयातील ग्रंथालयासाठी “छत्रपती शिवराय” हे पुस्तक भेट दिले आहे. तेच पुस्तक त्याच वर्गातील विद्यार्थिनी कु.गायत्री मेमाने हिने वाचन करण्यासाठी घेतलेले आहे. तसेच इयत्ता ७ वी अ मधील विद्यार्थिनी कु वैष्णवी चंद्रकांत कोतवाल हिने गरीब विद्यार्थ्यांसाठी एक डझन वह्या भेट दिलेले आहेत. त्या वह्यांचे वाटप इयत्ता ५ वी ,६ वी, ७ वी मधील गरीब विद्यार्थ्यांना देण्यात आले. कु मानसी जगताप आणि कु वैष्णवी कोतवाल यांना विद्यालयाच्या पर्यवेक्षिका दळवी मॅडम आणि सातपुते मॅडम यांच्या हस्ते एक वृक्ष रोप भेट देण्यात आले. त्या वृक्षाचे संगोपन आणि जोपासना करावे असे त्यांना सांगण्यात आले अशाप्रकारे विद्यालयांमध्ये वाढदिवसाचा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे.

Previous articleजयहिंद शैक्षणिक संकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
Next articleअपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यामुळे श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड