बी.जे.एस.च्या वाघोली विद्यालयातील विद्यार्थिनींना मलाबार चॅरिटेबल ट्रस्टची दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती

गणेश सातव,वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थीनींना मलाबार गोल्ड चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सी.एस.आर फंडा अंतर्गत सुमारे दहा लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. विद्यालयातील आर्थिक दुर्बल घटक, हुशार व गरजू विद्यार्थिनींना याचा शैक्षणिक बाबीसाठी मोठा फायदा होणार आहे.

मालाबार गोल्ड चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थीनीं कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अर्जांची विविध निकषांच्या आधारे वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळणी करून ऐंशी मुलींची यातून निवड करण्यात आली. लवकरच हि शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे असे फिनिक्स मॉल मलाबार गोल्ड अँड डायमंड शाखेचे मुख्य व्यवस्थापक मोहम्मद जेरीश यांनी सांगितले. सदर शिष्यवृत्ती प्रदानाचा कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात पार पाडला .

यावेळेस फिनिक्स मॉल मलाबार गोल्ड अँड डायमंड शाखेचे मुख्य व्यवस्थापक मोहम्मद जेरीश,श्रीमती शीतल डूबल,सुमन डेव्हिड व अशोक आढाव ,विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी,प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे,पर्यवेक्षक पांडुरंग पवार,उपप्राचार्य पोपटराव गेठे उपस्थित होते.सदर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यालयातील विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. यावेळेस प्राचार्य संतोष भंडारी यांनी विद्यालयाच्या वतीने मलाबार ट्रस्टचे आभार मानले.

Previous articleआधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार
Next articleजयहिंद शैक्षणिक संकुलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली