आधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – शिरुर येथे आधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यामध्ये सामाजिक कार्यात चांगले काम केल्याबद्दल कवठे ग्रा.सदस्या व राजमाता महिला गृपच्या सौ. वैशालीताई दिपक रत्नपारखी यांना पुरस्कार देण्यात आला.

वैशालीताई यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणुन केक ,ब्युटीशयन कोर्स सुरु केले त्यामुळे आज अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.त्याचबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव भेटावा म्हणून किल्ले बनवा स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या.तसेच महिलांच्या सहलींचे आयोजन करुन त्यांना विमानप्रवासाची संधी दिली.राजमाता महिला गृपच्या माध्यमातून राजे शिवशंभु व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतात.जागतिक महिला दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते शिरुर येथे करण्यात आले.

Previous articleकवठे ग्रामंचायत कडून मोकळ्या जागेत वृक्षारोपण
Next articleबी.जे.एस.च्या वाघोली विद्यालयातील विद्यार्थिनींना मलाबार चॅरिटेबल ट्रस्टची दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती