कवठे ग्रामंचायत कडून मोकळ्या जागेत वृक्षारोपण

धनंजय साळवे

कवठे येमाई येथे झाडांचे महत्व ओळखुन कवठे ग्रामंचायत कडुन मोकळ्या जागेत व स्मशानभुमीत वृक्षारोपन करण्यात आले.पाचशे झाडांचे वृक्षारोपन पंचायत कडुन करण्यात आले, नुसती झाडे न लावता त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेण्यात आली.याकामी सरपंच रामदासशेठ सांडभोर व ग्रामसेवक श्री.संतोष गायकवाड साहेब यांनी पुढाकार घेतला.नागरीकांना वाढत्या प्रदुषनामुळे श्वसनाचे अनेकआजार होत आहे नैसर्गिक आॕक्सिजन ची कमतरता जाणवते.आॕक्सिजनचे महत्त्व सर्वांना कोविडच्या काळात सर्वांनाच समजले आहे.तसेच नागरीकांना नारळसारखे फळे मुबलकप्रमाणात गावातच नाममात्र दरात भेटावे असे नियोजन करण्यात आले आहे.स्मशानभुमी परीसरात विविध प्रकारची झाडे लावल्यामुळे तेथील परीसर रमणीय झाला आहे. झाडांना रोज पाणी देण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी बबननाना शिंदे,हौसामामा शिंदे,कांतादादा पंचरास,गोटुभाऊ शिंदे,दळवी,उघडे,पंचरास हे नित्यनियमाने करत असतात.त्यांना ग्रा.सदस्य मधुकर रोकडे व सरपंच रामदास सांडभोर यांची मोलाची मदत होत असते.ते स्वतः जातीने लक्ष देत असतात.

ग्रा.सदस्य प्रविणशेठ बाफना,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,ग्रा.सदस्य निखिल घोडे पाटील ,ग्रा.सदस्य ईचके ग्रा. सदस्या सौ. मनिषा पांडुरंग भोर,ग्रा. सदस्या सौ. वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे,ग्रा. सदस्या सौ. ज्योति बाळशीराम मुंजाळ,ग्रा. सदस्या सौ. शोभा किसन हिलाळ,ग्रा. सदस्या सौ. सुनीता बबन पोकळे,ग्रा.सदस्या सौ.साधना नीलेश पोकळे,ग्रा.सदस्या मिनाताई डांगे,ग्रा.सदस्या सौ.दिपाली रत्नपारखी मा. सरपंच ,संगणक कर्मचारी सौ. प्रतिमा अमोल काळे,ग्रा.सदस्य गणेश उघडे,ग्रा.सदस्य उत्तम जाधव हे ही वारंवार भेट देत असतात.भावी काळात गावचा सर्व परीसर हिरवागार करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे.

Previous articleअष्टापूर ग्रामपंचायतवतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा
Next articleआधार छाया फाऊंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार