अष्टापूर ग्रामपंचायतवतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा

उरुळी कांचन

आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत असणे आवश्यक आहे. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे. महिलांनी एकत्रित येऊन बचत गटांच्या माध्यमातून तसेच रोजगार निर्मिती संदर्भात व शासकीय स्तरावरील अनेक योजनेचा लाभ घ्यावा असे मत अष्टापूरच्या सरपंच कविता जगताप यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महिलांंन करीता विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, उपसरपंच सुभाष कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, योगेश जगताप, शिरिष मोरे, ताई कोतवाल, ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे, कृषी आधिकारी निलम कासारे, अंगणवाडी शिक्षिका, आदी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपद्मश्री  मणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन संपन्न
Next articleकवठे ग्रामंचायत कडून मोकळ्या जागेत वृक्षारोपण