पद्मश्री  मणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन संपन्न

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन येथे सांस्कृतिक विभाग व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांचा १२५ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ होते.

या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे व महिला कक्ष समन्वयक प्रा.गायकवाड एस.जे यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर के अडसूळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. ‘विद्यार्थ्यानी त्यांचा आदर्श घेऊन जीवनाची वाटचाल करावी व आपले ध्येय गाठावे.’असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले. यावेळी प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. अनुप्रीता भोर, प्रा. शुभांगी रानवडे, प्रा. प्रणिता फडके, प्रा. वैशाली चौधरी, प्रा. अमोल बोत्रे, प्रा. प्रवीण नागवडे, प्रा. विद्या लाळगे यांनी केले. प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. बंडू उगाडे, प्रा.अंजली शिंदे, प्रा.डॉ. समीर आबनावे, प्रा. विजय कानकाटे, प्रदीप रजपूत, मोरेश्वर बगाडे कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous articleमहिलांच्या विविध प्रश्नांबाबत जागतिक महिला दिनी निदर्शने
Next articleअष्टापूर ग्रामपंचायतवतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा