महिलांच्या विविध प्रश्नांबाबत जागतिक महिला दिनी निदर्शने

सुरेश बागल,कुरकुंभ

भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघटित व असंघीटत महिला कामगारांच्या विविध प्रश्नां संदर्भात लक्षवेधी निदर्शने करून महिला दिनाची जागृती निर्माण करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात २ लाख ५६ हजार बिडी ऊद्योगातील महिला कामगार कार्यरत असून सरकारच्या नियम व कायदे मुळे बिडी रोजगार संपुष्टात येत आहे पण पर्यायी रोजगार ऊपलब्ध नसल्याने बिडी महिला कामगारांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला सामोरं जावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने १०/११/२०१४ रोजी च्या अधिसूचना नुसार निश्चीत केलेले किमान वेतन ही अद्याप मिळत नाही. सध्या कायदाप्रमाणे ३२४ रू .७३ पैसे प्रति हजार रू. मिळणे आवश्यक असताना सध्या १८८ रू. १५ पैसे च मिळत आहे. किमान वेतनच्या अंमलबजावणी करिता भारतीय मजदूर संघ संघाने शासना सोबत वारंवार संर्पक, आंदोलन करूनही शासन ने पुर्ण पणे दुर्लक्ष केले आहे. म्हणून जागतीक महिला दिनाच्या दिवशी रोजगार रक्षणासाठी, किमान वेतना करिता साबळे वाघिरे कारखाना भवानी पेठ पुणे येथे महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निदर्शने करून महिला वरील अन्याय दुर करण्या साठी संकल्प महिला दिनी करण्यात आला.

या वेळी अखिल भारतीय बिडी कामगार महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, बाळासाहेब भुजबळ सेक्रेटरी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा, वासंती तुम्मा, गिता नागुल, सुरेखा गुंदेटी, वैशाली शिरापुरी, महिला आघाडी प्रमुख वंदना कामठे, बेबीराणी डे ,यांनी मार्गदर्शन केले .
तसेच विज ऊद्योगातील महाराष्ट्र विज कामगार महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ च्या वतीने रास्ता पेठ, गणेश खिंड सर्कल आॅफीस, पिंपरी महावितरण कार्यालय येथे महिला कामगारांच्या खालील प्रश्नांची बाबतीत गेट मिटींग घेवून मागण्या करण्यात आले.
प्रमुख मागण्या-
१)मृत कामगारांच्या महिला वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, अन्यथा मासिक निर्वाह भत्ता मिळवा.
२) महिला लाईन स्टाफ ला बील वसुली करिता ग्राहकां कडून मिळणारे धमक्या, शिवीगाळ, मारहाण, विज प्रशासनाने कडक कायदे करून विशेष सुरक्षा पुरविण्यात यावी.
३) अधिकारी कडून महिला कामगारांना अपमानास्पद वागणूक, असभ्य भाषा वापरली जाते या बाबतीत त्वरित प्रतिबंध करून संबंधित व्यक्ती वर कारवाई करण्यात यावी.
४) महिला कामगारांना रात्र पाळीत सुरक्षा व प्रवासाची हमी प्रशासन ने द्यावी.
अशी मागणी पत्राचे निवेदन मा मुख्य अभियंता सचिन तालेराव यांना देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र विज कामगार महासंघाचे श्री सुरेश जाधव, रोहिणी पाटसकर, जयश्री शेलोकर, धनश्री कुंभार, भक्ती जोशी, भरत अभंग, ज्ञानेश्वर माने, शेखर मारणे , आदी महासंघाचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

Previous articleमहिला दिनचे औचित्य साधून वाचनवेड संस्थेच्या वतीने पुस्तकांचे वाटप
Next articleपद्मश्री  मणिभाई देसाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन संपन्न