महिला दिनचे औचित्य साधून वाचनवेड संस्थेच्या वतीने पुस्तकांचे वाटप

चाकण- पुणे येथील वाचनवेड संस्थेच्या माध्यमातून व देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या पुढाकारातून खेड मधील १९ जिल्हा परिषद शाळांना वाचनाची पुस्तके देण्यात आली.

पिंपरी बु ॥ जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ह.भ.प.सुप्रिया ताई ठाकूर,जि.प.सदस्य श्री. बबाजी काळे,सभापती सौ.वैशालीताई जाधव, श्री.कैलास गाळव,श्री.मंगेश सावंत गटशिक्षण अधिकारी अभंग प्रतिष्ठानचे श्री.सागर मोरे,श्री.सचिन कुंभार,प्रा.विकास कंद,श्री.सचिन काळोखे,श्री.अमोल काळोखे,श्री.लकी काळोखे इ.मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात.परंतू अवांतर वाचनासाठी वाचनसाहित्य उपलब्ध होत नाही.वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे,मयूर सेठ यांच्या माध्यमातून हर्षद सुराणा,सांभव भाटिया,दिपेन जैन तसेच संतोषी मित्र मंडळ,पुणे यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करुन दिली.

चरित्रात्मक पुस्तके वाचल्याने व्यक्ती चारित्र्यवान बनतो.संस्कार ही काळाची गरज असून पुस्तकांचे मानवी जीवनातील योगदान हे अनन्यसाधारण आहे,असे मत जि.प.सदस्य श्री. बबाजी काळे, यांनी व्यक्त केले. माणूस परिपूर्ण बनतो.चारित्र्य व समाजकार्य हीच माणसाची खरी संपत्ती असून त्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे असे विचार प्रा.विकास कंद यांनी व्यक्त केले.

ग्रंथ वाचन करणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून विश्वाची अनोखी सफर ही करू शकतो. पुस्तकाच्या या जगाचे वर्णन करताना प्रसिद्ध समीक्षक शंकर सारडा लिहितात,” पुस्तकांशी कधी तरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ-संगत करीत राहतात. पुस्तकाचे जग किती विशाल, किती अथांग….. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाचे आपलं नातं जोडणारा आणि भूत, वर्तमान, भविष्यकाळाचे वेध घेणारे ‘ हे विश्वची माझे घर’ याचा साक्षात्कार घडवणारे आहे.असे मत सुप्रिया ताई यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक विकास दादा ठाकुर यांनी केले. तर सुत्रसंचालन श्री.दिलीप ढमाले यांनी केले. आभार सौ.खोडदे यांनी मानले.

Previous articleकस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आदर्श नारी पुरस्काराने महिलांचा गौरव
Next articleमहिलांच्या विविध प्रश्नांबाबत जागतिक महिला दिनी निदर्शने