कस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्त आदर्श नारी पुरस्काराने महिलांचा गौरव

उरुळी कांचन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील कस्तुरबा मातृमंडळ यांच्या वतीने आयोजित आदर्श नारी पुरस्कार व वेशभूषा स्पर्धा आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. कस्तुरबा मातृमंडळाची स्थापना १४ मार्च १९८५ रोजी उरुळी कांचनचे भाग्यविधाते डॉ मणिभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक शैक्षणिक सामाजिक महिला व बालकांचा सर्वागीण विकासासाठी मातृमंडळ काम करत असते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी भूषविले. या कार्यक्रमात आदर्श नारी पुरस्कार पुष्पाताई पद्वाड, युमनाताई कांचन पाटील, श्रीमती विजया फुलफगर यांना देण्यात आला. वेशभूषा पुरस्कार अश्विनी जगताप, उषा गायकवाड, मिना मेटे यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशिला मेटे व कस्तुरबा मातृमंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, माजी सभापती योगिनी कांचन, मा.उपसरपंच संचिता कांचन, जेष्ठ सदस्या जयश्री बेदरे, मनिल फुलफगर, प्रिया बलदोटा, आशा कांचन, छाया नहार, अरुणा हेंद्रे, राजश्री शितोळे, साळुंखे ताई, आदी महिला उपस्थितीत होत्या. आभार संगिता भालके यांनी केले.

Previous articleदुबईतील शिवरायांच्या मावळ्यांनी शिवजयंती घराघरात केली साजरी
Next articleमहिला दिनचे औचित्य साधून वाचनवेड संस्थेच्या वतीने पुस्तकांचे वाटप