चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले

  चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी रविवारी (दि. ६ मार्च)  निवडण्यात आली. यामध्ये दैनिक लोकमतचे विजय मुऱ्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे प्रफुल्ल टंकसाळे व लोकमतचे भानुदास पऱ्हाड, सचिवपदी लोकमतचे शरद भोसले यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अशोक टिळेकर , कार्याध्यक्ष आदेश टोपे, सह कार्याध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, खजिनदार दत्ता बुट्टे, सहखजिनदार सतीश आगळे, संघटक- आयुष जाधव,  चाकण आळंदी विभाग पत्रकार परिषद प्रमुख म्हणून दैनिक सकाळचे रूपेश बुट्टे पाटील व गणेश फलके यांची निवड करण्यात आली. असून पत्रकार संघाचे सल्लागार म्हणून तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे व दैनिक पुढारीचे ए.पी.शेख यांची निवड करण्यात आली आहे.

यादरम्यान रुपेश बुट्टे पाटील यांची वराळे- आंबेठान- बोरदरा विविध कार्यकारी सोसायटीच्या  संचालकपदी निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

Previous articleचाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले
Next articleदुबईतील शिवरायांच्या मावळ्यांनी शिवजयंती घराघरात केली साजरी