चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले

   चाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी रविवारी (दि. ६ मार्च)  निवडण्यात आली. यामध्ये दैनिक लोकमतचे विजय मुऱ्हे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी पुणे लाईव्हचे प्रफुल्ल टंकसाळे व लोकमतचे भानुदास पऱ्हाड यांची व लोकमतचे सचिवपदी शरद भोसले यांची निवड करण्यात आली.

अन्य कार्यकारणी पुढील प्रमाणे – सहसचिव अशोक टिळेकर , कार्याध्यक्ष आदेश टोपे, सह कार्याध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, खजिनदार दत्ता बुट्टे, सहखजिनदार सतीश आगळे, संघटक- आयुष जाधव,  चाकण आळंदी विभाग पत्रकार परिषद प्रमुख म्हणून दैनिक सकाळचे रूपेश बुट्टे पाटील व गणेश फलके यांची निवड करण्यात आली. असून पत्रकार संघाचे सल्लागार म्हणून तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे व दैनिक पुढारीचे ए.पी.शेख यांची निवड करण्यात आली आहे.

यादरम्यान रुपेश बुट्टे पाटील यांची वराळे- आंबेठान- बोरदरा विविध कार्यकारी सोसायटीच्या  संचालकपदी निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

Previous articleकवठे येमाई येथे महिला दिन ऊत्साहात साजरा
Next articleचाकण आळंदी विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय मुऱ्हे ; सचिवपदी शरद भोसले