जागतिक महिला दिनानिमित्त श्री.विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या आदिशक्ती रुपी महिलांचा सन्मान

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या आदिशक्ती रुपी महिलांचा सन्मान करण्यात आला.देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांच्या नियोजनाखाली भाविक भक्तांसाठी ट्रस्टने एका नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे.

आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी’ श्रीं’ची महाआरती करण्याचा संकल्प देवस्थान ट्रस्टचा आहे. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त श्री.विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर यांच्या वतीने विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या, आदिशक्ती महिलांचा सन्मान म्हणून आजच्या मंगळवारच्या महाआरतीचा मान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पूर्वा दिलिप वळसे-पाटील, अहमदनगर जिल्हा तहसीलदार शीतल सैद, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, रेंज फ़ॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस, व्हिसकॉन रबर प्रा.लि.च्या मॅनेजिंग डायरेक्टर नीलम कडलग या मान्यवर महिलांना देण्यात आला.


यावेळी मान्यवर महिलांचा श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे, विश्वस्त बी व्ही मांडे, मंगेश मांडे, किशोर कवडे यांनी सत्कार करून सन्मान केला. यावेळी महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी उपस्थिती लावली व शासकीय नियमांचे पालन करत महाआरतीचा लाभ घेतला.

महिला शक्तीचा ओळख गौरव करून श्रीगणेशाची महाआरती करण्याचा योग घडवून आणल्याबद्दल उपस्थित सर्व सन्मानित महिलांनी श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे आभार व्यक्त केले.

Previous articleशिनोली येथे लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची बेकायदा कत्तल
Next articleमहिलांच्या कर्तृत्वास गिर्यारोहकांचा सलाम