येरवडा जेलमधून फरार झालेल्या आरोपीला दौंड पोलिसांनी केले जेरबंद

दिनेश पवार : दौंड

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमचे कलम व इतर गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असलेला आरोपी दोन वर्षांपूर्वी येरवडा जेलमधून पळून गेला होता त्यास दौंड पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

मोक्का या गुन्ह्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात अटकेत असलेले देवगण अजिनाथ चव्हाण ,गणेश अजिनाथ चव्हाण ( रा.बोरावके नगर दौंड) ,अकश्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण (माळवाडी, दौंड) हे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून दोन वर्षांपूर्वी पळून गेले होते,यातील देवगण चव्हाण व गणेश चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती,आरोपी अकश्या उर्फ अक्षय कोंडके त्यांचे घरी जात येत असल्याबाबत गोपनीय माहिती दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना समजताच त्यांनी पथके तयार करून त्यास शिताफीने अटक केली,.

ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड,पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,सुशील लोंढे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला

Previous articleहवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा
Next articleकवठे येमाई विविध कार्यकारी सोसायटीवर भगवा फडकला