आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- बळवंत गायकवाड

घोडेगाव

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असे गौरवोदगार प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी काढले.आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह शिनोली येथील मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या एच एस सी परीक्षेला जाताना करावयाची तयारी व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून गायकवाड साहेब बोलत होते..

आदिवासी विकास विभागातील विद्यार्थी यांनी आश्रमशाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना वेळेचा सदुपयोग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अवांतर वाचन करून १२ वी मध्येच आपले धेय्य निश्चित जीवनाचा मार्ग निवडला पाहिजे तर आपण यशाच्या शिखरावर निश्चित पोहचू असा आत्मविश्वास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला

मौजे शिनोली येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह येथे निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्याच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली नंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले त्या नंतर गृहपाल खरात यांनी प्रास्तविक केले त्या नंतर पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन वसतिगृह तर्फे सत्कार करणयात आला यानंतर यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सर यांनी सुप्रसिद्ध व्याख्याते जयसिंगराव गाडेकर यांच्या कार्याची ओळख करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .

या प्रसंगी इयत्ता १२वी व इयत्ता १०वी च्या विद्यार्थिनींना प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड व पाहुण्याच्या हस्ते गुलाब पुष्प लिखाणाचे पॅड व पेन देऊन सत्कार करण्यात आला या काळात १२ वी व १० वी च्या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली सहा प्रकल्प अधिकारी योगेश खंदारे व सहा प्रकल्प अधिकारी शिक्षण व्ही टी भुजबळ ,मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सर यांनी मार्गदर्शन केले या नंतर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा जयसिंग गाडेकर यांनी विद्यार्थिनींना इयत्ता १२वी व १० वी च्या परीक्षेला जाताना करावयाची तयारी या बाबत मार्गदर्शन करून मंत्र मूग्ध करण्यात आले

प्रास्तविक व सूत्रसंचालन गौतमराव खरात यांनी केले आभार विद्यार्थिनींनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Previous articleघोडेगाव येथील १३ वर्षीय दिप्तीचा प्रेरणादायी प्रवास
Next articleकवठे येमाई महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन