घोडेगाव येथील १३ वर्षीय दिप्तीचा प्रेरणादायी प्रवास

घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील रहिवासी दीप्ती ( बेबो ) बाळासाहेब काळे हीचा घोडेगावकरांना सार्थ अभिमान आहे. घोडेगाव येथील दीप्ती ही १३ वर्षाची असून या मुलीने ४ महिन्यात जवळ जवळ ३५०० किलो मिटर पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.तसेच तिच्याबरोबर मनीषा काळे, संजीवनी गव्हाणे व बाळासाहेब उर्फ शांताराम काळे यांनीही नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दलत्याबद्दल त्यांचे समस्त घोडेगावकर मंडळींच्या वतीने स्वागत करण्यात आले.

दीप्तीला ही परिक्रमा पूर्ण करताना तिच्याही मार्गामध्ये अनेक अडथळे आले .तिच्या पायाला इजा झाल्या परंतु तिने न थकता चार महिने पायी प्रवास करून नर्मदा मैयेच्या आशीर्वादाने ही परिक्रमा पूर्ण केली. अनेक वेळा जेव्हा तिला फोनवर विचारलं जायचं तुला थकल्यासारखं वाटतंय का तुला काही त्रास होतोय का परंतु ती तिकडून खूप सुंदर उत्तर द्यायची मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही हसत-खेळत चालत अत्यंत आनंदाने ही परिक्रमा पूर्ण करत आहे.

परिक्रमा पूर्ण करून घोडेगाव परिसरात आल्यावर प्रथम श्री हरिश्चंद्र महादेव मंदीर येथे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर यांच्या संकल्पनेतून नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण करून आलेल्या भक्तगणांची जंगी मिरवणूक घोडेगाव परिसरात काढण्यात आली या वेळी संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने दिप्तीचा व तिच्या परिवाराचा उचित असा सन्मान घोडेगाव येथील चावडी चौक येथे करण्यात आला.

याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पुरुषोत्तम भास्कर ,घोडेगावचे सरपंच क्रांतीताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, पतसंस्थेचे संचालक कैलासशेठ सोमवंशी ,गोविंदशेठ घोडेकर ,रत्नाताई गाडे, नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर ,आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ समन्वय समितीचे चेअरमन संतोष भास्कर ,धनंजय काळे, सतीश जाधव , वैभव मंडलिक, पोपट कासार ,रमणबाबा मेहेर, गणेश घोडेकर, माधव काळे, लक्ष्मण गव्हाणे ,सावता महाराज पतसंस्थेच्या सचिव दिपाली मेहेर, प्रियांका भास्कर, वर्षा काळे ,सविता काळे ,अनिता काळे ,विमल काळे ,मीराबाई काळे ,निर्मला काळे ,तसेच घोडेगाव ग्रामस्थ व संपूर्ण नर्मदे हर परिवार उपस्थित होता

Previous articleआंबेगाव तालुक्यात वन विभागामार्फत आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे: ट्रायबल फोरमची मागणी
Next articleआत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- बळवंत गायकवाड