आंबेगाव तालुक्यात वन विभागामार्फत आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे: ट्रायबल फोरमची मागणी

घोडेगाव- वन विभागामध्ये भीमाशंकर वनपरिक्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे ही मागणी घेऊन ट्रायबल फोरमचे शिष्टमंडळ यांनी वनपरिक्षेत्राधिकारी श्री महेश गारगोटे यांची घोडेगाव येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात भेट घेतली यावेळी ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर हरीश खामकर तालुका कार्याध्यक्ष दीपक चिमटे महासचिव विशाल दगडे तसेच ट्रायबल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सकारात्मक चर्चा होऊन आदिवासी भागातील रोजगारासाठी उपाययोजनांच्या मार्फत व शासकीय योजना राबवून अनेक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री महेश गारगोटे यांनी दिली.

वृक्ष लागवड वृक्ष संगोपन तसेच गॅस बंब अशा योजना आदिवासी भागात राबवाव्यात स्थानिकांना वनक्षेत्रात गौण खनिज साधनसंपत्ती तसेच गौण वन उत्पादन याबाबत माहिती द्यावी मार्गदर्शन करावे त्याच बरोबर वन विभागाने स्थानिक आदिवासींना बांधवांना विश्वासात घेऊन योजना राबवाव्यात जेणेकरून वन विभाग व स्थानिक आदिवासी ग्रामस्थ मध्ये सहकार्याची भावना वाढेल असे मत डॉक्टर हरीश खामकर यांनी व्यक्त केले त्याच प्रमाणे मा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार वृक्ष लागवड व संवर्धन समिती पुनर्गठीत करावी त्याचबरोबर वन विभागामार्फत तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याबाबत ही मत मांडण्यात आले याबाबत लवकरच समिती स्थापन करू असे वनविभागातर्फे आश्वासन देण्यात आले आहे.

Previous articleनिरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न
Next articleघोडेगाव येथील १३ वर्षीय दिप्तीचा प्रेरणादायी प्रवास