मराठी भाषा गौरव दिन व शुभेच्छा समारंभ संपन्न

घोडेगाव – येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात नुकताच मराठी भाषा गौरव दिन आणि या वसतिगृहात राहून इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.काळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या अधीक्षिका सुहासिनी कांबळे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. वाल्हेकर यांनी ‘कवी भुजंग मेश्राम यांच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहातील ‘आश्रम शाळेतल्या कविता’ या शीर्षकाखाली असलेल्या पाच कवितेतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्या जगण्याची पद्धत, परिवर्तन आणि सुधारणावादी विचार, विद्यार्थ्यांची जिद्द, विद्यार्थ्यांचे ध्येय,त्यांचा नवा दृष्टीकोण परिचय करून दिला. विशेषतः तानाजी सिडाम, नरसिंह राठोड, भिमराव बोईनवाड, कोंडबा गिरडकर, लहान्या शिंगड्या या कवितेतील विद्यार्थी पात्रांचा परिचय करून दिला.याशिवाय इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांनी येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कावेरी सुपे यांनी केले.

Previous articleशेतकरी अडचणीत असताना विकास सोसायटीकडे राजकारण म्हणून पाहू नका-सरपंच योगेश पाटे
Next articleनिरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न