कवठे वि. कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रचाराची सांगता

धनंजय साळवे

कवठे येमाई – कवठे वि. कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलची जोरदार प्रचार सभेने सांगता झाली. यावेळी जोरदार शक्ति प्रदर्शन या पॅनल तर्फे करण्यात आले. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली.

यामध्ये मुख्यता श्री. मोहनशेठ पडवळ,श्री.रोहिदास हिलाळ श्री. नामदेव शिंदे,श्री.डॉ. शितोळे, श्री.डॉ.हेमंत पवार, श्री.आबाशेठ वागदरे,श्री.रितेश शहा यांची भाषणे झाली. श्री.दिनकर घोडे यांनी सूत्रसंचालन केले.सभेचे अध्यक्ष सरपंच श्री.रामदासशेठ सांडभोर हे होते. ह्या पॅनलचे एक प्रमुख पं.समिति सदस्य श्री.डॉ. पोकळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करता आली असती परंतु विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप केला .

जर आम्हाला निवडून दिले तर आम्ही सभासदांंना चांगली सेवा देण्याचा नक्की प्रयत्न करू असे आपल्या भाषणात सांगितले. सोसायटीचे एक प्रमुख उमेदवार मा. सरपंच श्री. बबनराव पोकळे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली.ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर लाखों रुपयांची बचत झाली असती. जर सर्वांचे बिनविरोध करायचे ठरले असते तर मी माघार घ्यायला तयार होतो. पण विरोधकांना ही निवडणूक बिनविरोध करायची नव्हती त्यामुळे मी उभा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती असा सर्वांचाच सुर होता.मुंजाळवाडी सोसायटीच्या पराभवास ज्या चुका झाल्या त्या टाळावयास हव्या, मतदारांना योग्य मार्गदर्शन करुन मते बाद होणार नाही ह्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॕनल जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने मात्र आज सभेपेक्षा मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला. पॕनलच्या उमेदवार व नेत्यांनी पक्षाने केलेल्या विकासकामांवर आम्हाला मतदार निवडून देतील असे सांगितले.

शेतकर्याच्या अडचणी कशा दुर होतील या कडे लक्ष्य दिले जाईल.या पॅनलची धुरा श्री. बबन पोकळे (मोठा मामा)युवा नेते श्री.बाळासाहेब डांगे मा. पं,सदस्य सुदामभाऊ इचके,मा. सरपंच श्री.दीपक भाऊ रत्नपारखी,श्री.बाजीरावनाना उघडे,श्री.दत्ताशेठ सांडभोर,श्री.रोहिलेसर,श्री.समाधान वागदरे यांच्यावर राहील. ही निवडणूक येत्या शनिवारी दिनांक ०५/०३/२०२२ रोजी होत आहे व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. कवठे सोसायटीची बऱ्याच वर्षांनी निवडणूक होत असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराची राळ उठविण्यात आली. अनेक आरोप – प्रत्यारोप झाले. शुक्रवारी प्रचार नसल्यामुळे छुपा प्रचारवरच भर असेल. या निवडणुकीत नातेगोते व पक्ष हाच मुख्य मुद्दा राहील असे वाटते.

Previous article१४ एप्रिल २०२२ रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होणार- गौतम खरात
Next articleशेतकरी अडचणीत असताना विकास सोसायटीकडे राजकारण म्हणून पाहू नका-सरपंच योगेश पाटे