मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 1 मार्चला दौंड बंद – मराठा क्रांती मोर्चा

दिनेश पवार:दौंड,प्रतिनिधी:

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी दौंड शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळावर दि. १ मार्च 2022 रोजी दौंड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत,काही मागण्या अपूर्ण आहेत यासंदर्भात बैठका, आंदोलन करून देखील याकडे लक्ष देण्यात आले नाही तरी याची त्वरित दखल सरकारने घ्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा ने केली आहे.

२६ फेब्रुवारी 2022 पासून मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी दि. १ मार्च रोजी दौंड बंद आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे दौंड शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous articleमोहळाच्या माशांचा ३० विद्यार्थ्यांचा घेतला चावा
Next articleमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 1 मार्च ला दौंड बंद – मराठा क्रांती मोर्चा