मोहळाच्या माशांचा ३० विद्यार्थ्यांचा घेतला चावा

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर येथील मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी आलेल्या कडूस ता.खेड येथील इंग्रजी माध्यम शाळेतील ६९ विद्यार्थी आले होते. परंतु लेणी जवळ जाताच मोहळातील माशांनी त्यापैकी ३० मुलामुलींना चावा घेतल्याने जखमी झाले आहेत. त्यातील जणांवर ग्रामिन रुग्णालय जुन्नरमध्ये उपचार करण्यात आले असून १ विद्यार्थीनी ला मधमाशानी जास्त चावा घेतल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.तसेच इतर १० विद्यार्थी व १ शिक्षिकेस नारायणगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. इतर विद्यार्थीपैकी
२० विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.डायनॅमीक इंग्लिश मिडीयम स्कुल कडूसचे ६९ विद्यार्थी विद्यार्थिनी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यात आले होते.

हडसर किल्ला पाहून झाल्यानंतर ते मानमोडी डोंगरावरील लेणी पाहण्यासाठी गेले असता मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने गोंधळ उडाला.

सदरची घटना समजताच वनरक्षक खरमाळे, माजी नगरसेवक संजय साखला,उद्योजक संजय वारुळे,मयूर महाबरे,राजकुमार चव्हाण,विनायक मांडे,फिरोज पठाण,प्रशांत कबाडी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व जखमींना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.आमदार अतुल बेनके यांनीही तातडीने ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे धाव घेऊन संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी ग्रामीण रुग्णालय जुन्नरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उजगरे, डॉ.सरदे,तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अक्षय शेवाळे,डॉ.इनामदार यांनी जखमींवर उपचार केले तर संगीता शिंदे,रेश्मा वर्हाडी,चैताली चव्हाण,सुनंदा पवार,स्वाती खमसे,रत्नप्रभा वायकर,सोनम साळवे,अतिष वाघेला व वाहिद पठाण यांनी जखमींवर उपचार करण्यास सहकार्य केले.

Previous articleनारायणगाव येथील रक्तदान शिबिरात १६९ रक्तदात्याचे रक्तदान
Next articleमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 1 मार्चला दौंड बंद – मराठा क्रांती मोर्चा