शामशेठ पवळे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरव’

राजगुरूनगर- शिवतीर्थ वाकळवाडी (ता.खेड) येथील सुपुत्र आणि शिवछत्रपती मार्केट यार्ड गुलटेकडी-पुणेचे युवा आडतदार शामशेठ दत्तात्रय पवळे यांची शेतकरीप्रेमी सेवाभावी वृत्ती आणि ‘दिवाणजी ते आडतदार’ या कार्यकर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना ‘कृषिनिष्ठ’ पुरस्काराने गौरविण्यात आले

मराठी राजभाषा दिन आणि खेड तालुक्याचे सुपुत्र पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त खेड पंचायत समिती सभागृहामध्ये हा समारंभ संपन्न झाला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, मा.आमदार आणि नामदेव ढसाळांचे मावसभाऊ जयदेव गायकवाड, जनसेवा बॅंकेचे मा.अध्यक्ष सतिश गोरडे, मसापच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार, लेखक डाॅ.श्रीरंग गायकवाड, कवी देवा झिंजाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, रामचंद्र सोनवणे, अमित टाकळकर, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश सुतार, मारुती सातकर, पी.टी.शिंदे, बाळासाहेब सांडभोर आदी मान्यवर साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्यप्रतिभा पुरस्काराने कवी-लेखकांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कृषिनिष्ठ पुरस्कार- शामशेठ पवळे, संत गाडगेबाबा पुरस्कार – हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन राजगुरुनगर, ‘उद्योगरत्न पुरस्कार’ – किरणदादा आहेर, पठ्ठे बापूराव कला पुरस्कार- भुईदर गरुड , युवागौरव पुरस्कार- वैभव राक्षे, ज्योती-सावित्री पुरस्कार- कल्याणी गारगोटे-रामाणे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मसापचे अध्यक्ष संतोष गाढवे, उपाध्यक्ष सदाशिव आमराळे, डाॅ.निलम गायकवाड, किशोर भगत, डी.के.वडगावकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक संतोष गाढवे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज पवळे यांनी केले.

Previous articleऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन मुलांना पोलिओचा ढोस !!
Next articleकवठेयेमाईत महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन