दत्तात्रय वाळुंज यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

नारायणगाव ( किरण वाजगे )

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्या जवळील वाळुंजपाणी शिवारातील दत्तात्रय गेनभाऊ वाळुंज यांच्या शेतातील सुमारे दीड ते दोन एकर ऊस, वीज रोहित्राजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे असा अंदाज येथील येथील शेतकरी सुरज सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असून या घटनेचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान स्थानिक शेतकर्‍यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तरीदेखील मोठ्या प्रमाणात येथील ऊस जळून खाक झाला आहे.

दरम्यान तोडणीस आलेला ऊस जळाल्याने संबंधित कारखान्याने हा ऊस तात्काळ तोडण्यास सुरुवात करावी अशी मागणी देखील शेतकरी दत्तात्रय वाळुंज यांनी केली आहे

Previous articleखेड तालुक्यातील एक नंबर ग्रामपंचायत नावाने होतोय सावरदरी गावचा उल्लेख….!
Next articleनिराधार पेन्शन योजनेत वाढ करण्याची किसान सभेची राज्यशासनाकडे मागणी