खेड तालुक्यातील एक नंबर ग्रामपंचायत नावाने होतोय सावरदरी गावचा उल्लेख….!

चाकण : उद्योग नगरी सावरदरी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या माध्यमातून विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. उद्घाटन सरपंच भरत तरस, उपसरपंच संदिप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

एक वर्षाच्या कालावधीत गावात एकुण लहान मोठी ३२ कामे पूर्ण केली आहे. जवळपास २ कोटी ४० लाख रुपये पर्यंत ची कामे अल्पावधीतच पुर्ण केली आहे. गावामध्ये प्रथमच कमी वेळात एवढी मोठी विकासकामे झाल्याने खेड तालुक्यातील एक नंबर ग्रामपंचायत म्हणून सावरदरी गावचे नाव कौतुकाने घेतले जात आहे.

त्याचबरोबर याचे सर्व श्रेय गावचे सरपंच भरत तरस व उपसरपंच संदिप पवार यांना दिले असून त्यांना विकास पुरूष होण्याचा मान सन्मान लाभला आहे. असे कौतुक नागरिकांमध्ये केले जात आहे.

गावातील जेष्ठ नागरिक यांचा आशीर्वाद आणि बंधु भगिनी तरूण कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने ही मोठी कामे यशस्वी झाल्याचे आणि गावचा विकास झाल्याचे मत यावेळी उपसरपंच संदिप पवार यांनी बोलतांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप मेंगळे, सदस्या निता शेटे, सदस्या बारकाबाई गावडे, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, पोलिस पाटील राहुल साकोरे आणि ग्रामस्थ मच्छिंद्र शेटे, संतोष शिंदे, गणपत साकोरे, विश्वास धोंडगे, आप्पा शेटे, भगवंत शिंदे, महादु पवार, तुकाराम सोनवणे, उत्तम शेटे, बाळु बोत्रे, अंकुश कदम, मारुती पवार, निवृत्ती पवार, बाळु साकोरे, तुकाराम बोत्रे, शंकर पवार, बाबुराव शेटे, शिवाजी बोत्रे, संदिप गुप्ता, विलास बुचुडे, बाळासाहेब पवार, नितीन सोनवणे, संतोष बुचुडे, नानासाहेब शेटे, निखिल पवार, भाऊसाहेब शेटे, संतोष पवार, बाळु शेटे, राघु सोनवणे, करण शेटे, कृष्णा साकोरे, रवी बुचुडे, नवनाथ साकोरे, नितीन सोनवणे, अंकुश सोनवणे, आप्पा धोंडगे, मिथुन शिंदे, पोपट गाडे व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरयत शिक्षण संस्थे कडून कवठे येमाई येथील हायस्कुलच्या वर्ग खोलीसाठी 10 लक्ष रुपये मंजूर
Next articleदत्तात्रय वाळुंज यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक