रयत शिक्षण संस्थे कडून कवठे येमाई येथील हायस्कुलच्या वर्ग खोलीसाठी 10 लक्ष रुपये मंजूर

धनंजय साळवे,कवठे यमाई

कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेसाठी  वर्ग खोलीसाठी रयत शिक्षण संस्थेने 10 लक्ष रुपये मंजूर केले आहे.ह्या वर्ग खोलीमुळे मुलांना अजून एक वर्ग उपलब्ध होणार आहे. काही वर्षा पूर्वी शाळेची जुनी ईमारत जळून खाक झाली होती.

यावेळी संस्थेने फंडातून व ग्रामस्थांनी लोकवर्गनीतुन नवीन सुसज्ज ईमारत उभी केली होती. पुन्हा एकदा संस्थेने 10 लक्ष रुपये मंजूर केले .   त्या वर्ग खोलीचे  भूमिपूजन स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. अर्जुनदादा सांडभोर यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी पं. सदस्य डॉ.श्री.सुभाष पोकळे,युवा नेते श्री.बाळासाहेब डांगे. सरपंच श्री.रामदासशेठ सांडभोर,मा. सरपंच श्री.दिपकभाऊ रत्नपारखी, प्राचार्य श्री.अभंगसर,मा. ग्रा. पं. सदस्य श्री.मिटठूशेठ बाफणा, डॉ.श्री.शितोळे ,श्री. रितेश भैय्या शहा. श्री. बाळासाहेब इचके,श्री.बबन वागदरे, येस क्लबचे अध्यक्ष श्री.नवनाथशेठ सांडभोर, श्री.नाथाशेठ पळसकर,श्री. पोपटशेठ रोहिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleजेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा विज्ञान विषयावर विद्यार्थीनींशी संवाद
Next articleखेड तालुक्यातील एक नंबर ग्रामपंचायत नावाने होतोय सावरदरी गावचा उल्लेख….!