जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा विज्ञान विषयावर विद्यार्थीनींशी संवाद

धनंजय साळवे,कवठे यमाई

महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविदयालय कर्वेनगर पुणे येथील विद्यार्थीनींशी जेष्ठ शास्त्रज्ञ श्री.जयंत नारळीकर यांनी संवांद साधला व मुलींच्या विज्ञान विषयाच्या सर्व शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले.ते जेष्ठ शास्त्रज्ञ असुनही बोलण्यात तसे दिसुन आले नाही मनमोकळेपणाने मुलींच्या शंका दुर केल्या .हा अनुभव खुप अविस्मरणीय असल्याचे मुलींनी सांगितले .त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहिल्या आहेत.ते एक प्रसिद्ध गणितज्ञ आहेत.त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्र विभागात प्रमुख म्हणुन काम केले आहे.आयुकाच्या संचालक ते होते.त्यांनी सर फ्रेड हाॕयेल यांच्या बरोबर कन्फाॕर्मल ग्रॅव्हीटी थिअरी मांडली सामान्य माणसाला खगोलशास्र समजविण्यासाठी अनेक वर्षे घालविली.त्यांनी विज्ञानाच्या मुलींना चांगले मार्गदर्शन करुन विज्ञानविषयाची रुची वाढविली.

त्यांची विज्ञानकथा पुस्तके -अंतराळातील भस्मासुर,अंतराळातील स्फोट, अभयारण्य ,चला जाऊ अवकाश सफरीला’टाइम मशीनची किमया, प्रेषित,यक्षांची देणगी,याला जीवन ऐसे नाव,वामन परत न आला,व्हायरस,इतर विज्ञानविषयक पुस्तके अंतराळ आणि विज्ञान,आकाशाशी जडले नाते,गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती), नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर),नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान,Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge), युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी),विश्वाची रचना,विज्ञान आणि वैज्ञानिक,,विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप,विज्ञानाचे रचयिते,समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक),Seven Wonders Of The Cosmos,सूर्याचा प्रकोप,आत्मचरित्र-
चार नगरांतले माझे विश्व.

Previous articleप्रा. सचिन घायतडके नेट परीक्षा उत्तीर्ण
Next articleरयत शिक्षण संस्थे कडून कवठे येमाई येथील हायस्कुलच्या वर्ग खोलीसाठी 10 लक्ष रुपये मंजूर