पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेची हवेली तालुका कार्यकारणी जाहीर

उरुळी कांचन

वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने नवीन हवेली तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. हा कार्यक्रम अष्टापुर येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अष्टापुर माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देण्यात आली यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प प्रशांत महाराज मोरे यांनी त्यांचे विचार मांडताना संतांचे विचार लहानपणापासूनच शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक गावांमधील शाळेमध्ये संत साहित्य शिकविण्यासाठी स्वतः वेळ देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पसायदान भजन, किर्तन, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा या माध्यमातून संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे साहित्य परिषदेने हे काम हाती घेतले आहे.

यावेळी अष्टापुर गावचे माजी सरपंच व प. स. हवेलीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांनी आपले विचार मांडताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओवी प्रमाणे अष्टापुर गावामध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार वृक्षांची लागवड व त्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आलेले आहे. प्रत्येक झाडाला ड्रिप एरीकेशन द्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जर प्रत्येक वेळेस दिंडीबरोबर जाणाऱ्या प्रत्येक वारकरी याने जर दिंडीस निघताना प्रत्येकाने पाच वृक्षांचे लागवड जर केली तर तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे वृक्ष लागवडीची एक मोठी चळवळ निर्माण होईल. त्यानंतर सुभाष जगताप सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

त्याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये संजय किसन कोतवाल यांची हवेली तालुका वारकरी साहित्य परिषद उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ह भ प पोपटराव साठे यांची हवेली तालुका वारकरी संप्रदाय साहित्य परिषदेच्या सचिवपदी निवड करण्यात आली. ह भ प नंदकुमार कटके यांची विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्रिंबक बांगर यांचीही विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. विठ्ठल विष्णू गावडे यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली तसेच संभाजी महाराज आपुने व उद्धव जगताप व पांडुरंग उभे व जालिंदर गोते व सोमनाथ भोरडे व उत्तम साठे यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच कविता योगेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, पांडुरंग महाराज घुले, रामदास महाराज कुटे, हवेली ता.अध्यक्ष मोहन महाराज मगर, पुणे शहर अध्यक्ष आनंद महाराज कदम, मा.संचालक श्रीहरी कोतवाल, सुखदेव कोतवाल, चेअरमन रामदास कोतवाल, पो.पाटील कैलास कोतवाल, गणेश कोतवाल, सुरेश कोतवाल, भीमराव कोतवाल, अंकुश कोतवाल, अभिमान कोतवाल, भाऊसाहेब जगताप, मल्हारी गावडे, शिवाजी कोतवाल, ज्योत्स्ना बगाटे,
मुख्याध्यापीका समिंद्रा पांडव, संदीप कोतवाल आदी उपस्थित होते.

Previous articleसराईत गुन्हेगार संकेत गायकवाड २ वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार
Next articleकवठे येमाई व मुंजाळवाडी सोसायटीच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग