सराईत गुन्हेगार संकेत गायकवाड २ वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार

उरुळी कांचन

लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदारांसह धुमाकूळ घालून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणाऱ्या कदमवाकवस्ती (ता. हवेली ) येथील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

संकेत सुनिल गायकवाड (वय-२५, रा. कवडीपाट टोलनाका, गुजरवस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली) असे दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संकेत गायकवाड हा वारंवार गुन्हे करीत असले बाबत तसेच त्याच्या गुंड साथिदारांसह कदमवाक वस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत साथीदारांबरोबर दहशत निर्माण करीत होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचे गुंड व दहशती कृत्यामुळे गुन्हे करीत असलेने त्यांचेविरुध्द नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.

पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी संकेत गायकवाड याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची पडताळणी करून सोमवारी (ता. २१ ) संकेत गायकवाड यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस शिपाई मल्हार ढमढेरे यांनी केली आहे.

Previous articleभावी पिढीला प्रेरणादायी असे स्मारक कोरेगाव भिमा येथे उभारावे :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
Next articleपुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेची हवेली तालुका कार्यकारणी जाहीर